STORYMIRROR

Vitthal Jadhav

Tragedy

3  

Vitthal Jadhav

Tragedy

रीतीने ये...

रीतीने ये...

1 min
209

पडू नको अवकाळी

रीतीने ये पावसाळी

नक्षत्राचे रीते डोळे

ढगा देते आर्त हाळी

कायम दुष्काळ भाळी

डोंगर रान कपारी

करवत नाही झाडा

तू पडून जा दुपारी

भय वाटतेय तुझे

ना भरवसा घडीचा

तुझ्या न येण्याने

संसार वाया पिढीचा

डोळे शिणले भागले

वर शिराळ ढगांचे

रानी कासावीस जीव

देठ सुकले पिकांचे

कुठे आलेला पूर

इथे सलतो डोळ्यात

नदी सिंचन हंगामी

मलिदा खाती तळ्यात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy