Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vitthal Jadhav

Tragedy Children

3  

Vitthal Jadhav

Tragedy Children

सखू गं सखू

सखू गं सखू

1 min
186


सखू ग सखू,कुठं चाललीस?

बाजारात जाते, बाजारहाट करते

भाजीपाला आणते,फळबिळं आणते

अंगडे टोपडे बघते,बाळा खाऊ घेते


सखू ग सखू , कुठं चाललीस?

पाचदहा रूपये घेते, दुकानात जाते

गंध पावडर आणते,फणीबिनी बघते

साबणतेल आणते,बाळा न्हाऊ घालते


सखू ग सखू, कुठं चाललीस ?

दवाखान्यात जाते,डाक्तरला दावते

दवापाणी घेते, डिकमली बघते

गुट्टीबिट्टी लावते,बाळाला लई जपते


सखू ग सखू, कुठं चाललीस?

माहेराला जाते,आईला पाहते

बाबांच्या पाया पडते,वहिनीस बोलते

बाळाला मामा दावते, गावमळा पाहते


सखू ग सखू, कुठं चालली ?

मराठी शाळेत जाते, गुरूजींना बोलते

जन्मतारीख सांगते,पतीचं नाव घेते

बाळाच नाव घालते, माणूस बनवते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy