STORYMIRROR

Sanjana Kamat

Tragedy Inspirational Others

4  

Sanjana Kamat

Tragedy Inspirational Others

भगदाड

भगदाड

1 min
23.7K

आज पाहिली मी माझी शाळा,

भगदाड कोनाड्यात लपलेली.

तिच्या जागे आक्रमण इंग्रजीने केलेली,

दुजाभाव देऊन ऐटीत वसलेली.


दोन्ह शाळेच्या इमारतीत वाटलेली,

साश्रुनयनाने जी पाहे कित्येक भरारी.

काळ्या फळ्यात भविष्य फुलवणारी,

सोनेरी पंखातून आसव पाझरणारी.


 स्वकीयानेच काळजा भगदाडलेली,

तिमीर नाशकी नक्षत्र शोधत बसलेली.

मोरपंखी क्षणांच्या आठवणीत झुरत,

अस्तित्व स्वतःचे पाहे साखळदंडात.


त्या निर्माल्याची दशा तिच्यात भासत,

झिर्ण वस्त्रात सूर्याचे तेज ती लपवित.

शाळेच्या आठवणी सजे देव्हाऱ्यात,

पाहे भगदाड भिंती व्याकूळ साद देत.


प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान,

महाराष्ट्रात मराठीस मिळवून द्या मान.

नको घराघरात उभी इंग्रजी वहिवाट,

थोर किती चढे निशिगंधाची मेळघाट.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy