शेतकरी जगला पाहिजे
शेतकरी जगला पाहिजे
कधीतरी सरकारनं
शेतकऱ्यांच भी एकून
घेतल पाहिजे
शेजारी बसून त्याचं गाऱ्हाण समजून घेतल पाहिजे
नुसते आश्वासन देवून
दिशाभूल काय करतात
मतं मागायच्यावेळी कितीदा त्याचा पाया पडतात
अरे द्या की शेतकऱ्याने
पिकवलेल्या धान्याला
त्याच्या मनासारखा हमीभाव
स्वतःच्या स्वार्थासाठी
नका खेळू रे त्याच्यासंगे
मतलबाचा डाव
अरे तुम्ही ऐशोआरामात
राहतात
तसा तो आरामात ऱ्हातं नाही
शेतकऱ्याशिवाय तुमचं
सरकार बसत नाही
अरे पिकांची नासाडी होते तेव्हा तुम्ही
त्याच्या शेताच्या बांधावर
पाहणीलाही कधी जातात का
गेलात तरी ऐसी गाडीतून खाली उतरतात का
हात जोडून तो तुम्हाला
विनंती करत असतो
तुमच्या पायावर त्याच्या अश्रूंचा अभिषेक वाहतो
तुम्ही जगतात तसा शेतकरी जगत नाही
सुखाच जगणं कधी त्याच्या वाटेला येतं नाही
अरे मदतीची वाट पाहून
त्याची तेरावी पुजली जाते
तरी मदत मिळत नाही
पोटात भूक उकळते
तरी चुलीवर भाकर शिजत नाही
तुम्ही पंचतारांकित हॉटेलात
पंचपक्वान्नावर ताव मारतात तेव्हा
शेतकरी उपाशी निजत असतो
पोटात जळणाऱ्या भुकेला
पाणी पिऊन शांत करत असतो
मोठ्या फुशारक्या मारून शेतकऱ्याला राजा म्हणतात राव
पण राज्याची अवस्था
ना घर का ना घाट का अशीच असते
वेदना यातना संघर्ष तर
त्याच्या पाचवीला पुजलेली दिसते.
आधीच तो कर्जाने हैराण झालो असतो
वर्षानुवर्षे सावकाराचे पाय धरतो
अरे एकदा तरी त्याला
त्याच्या मनासारख जगू द्या
त्यालाही ऐसी गाडीची हवा खावू द्या
शेतकरी मालामाल झाल्यावर
तुमच्या हातात भिक्षापात्र येणार नाही
शेतमालाला हमीभाव दिल्यावर
मतं तुमचं फुटणार नाही
म्हणून म्हणतो....
शेतकरी जगला पाहिजे
तरच या देशात सुजलाम सुफलामता येईल
आणि देश सुखात राहील
