STORYMIRROR

Amol Shinde

Tragedy

4  

Amol Shinde

Tragedy

काळजानं आत्महत्या केली

काळजानं आत्महत्या केली

1 min
22.6K

काळजात घर करणारी ती 

घर सोडून गेली

खूप शोधलं तिला

ती भेटलीच नाही

डोळ्यातून येणाऱ्या आसवांनी

विचारपूस सुरू केली

दुःख कवेत घेणाऱ्या धरणीला

समुद्राचे वेगवेगळे किनारे

तिथेही गेलो खुणा तशाच होत्या

वाळूवर घर करून बसल्या होत्या

एकत्र गुजगोष्टी केलेल्या जागेवर 

तिची ओळख सांगून विचारपूस केली

त्यांनीही कणाडोळा केला

खोट्या प्रेमाचा सारा किस्सा उलगडला


सांग ना रे मग...

कोण कुठे होता चुकलेला...


थकून थकून सांज झाली

कट्ट्यावर बसून एक एक

आसवांना दोष दिला तर

त्यांना चांगलाच हिसका आला

आम्हाला वाया घालणारा तू बघ जरा

ज्याला जीव लावला तो दगा देऊन गेला

अंधुक दिसणाऱ्या सूर्याला विचारलं 

तू खरंच होतास ना रे सोबतीला


सांग ना रे मग...

कोण कुठं होतं चुकलेला...


हळू हळू चंद्र चांदण्यांची

मैफिल सुरू झाली

एक चांदणी चंद्राजवळ आली

म्हणाली हाच तो वेडा 

ज्यानं प्रेमाची सीमा पार केली

रातकिडे, काजव्यांनी 

एकच कालवा सुरु केला

जो तुझा नव्हताच कधी

तो तुला सोडून गेला


सांग ना रे मग...

कोण कुठे होता चुकलेला...


डोळे मिटण्याची 

घाई सुरू झाली

अचानक काळजाची 

धड धड थांबली

श्वासांनी हंबरडा फोडला

गावात चर्चा सुरू झाली

प्रत्येकाने वेगवेगळा अंदाज बांधला

पोरगं नाहक मेलं कर्मानं गेलं

शरीरानं साथ सोडली

आठवणींनी सांत्वन केलं

स्वप्नांनी पांघरून घातलं

आत्मा शोधू लागला आडोसा

घेऊ लागला कानोसा 

नेमकं कोण मेलं अन नेमकं कोण गेलं


एकदाच माहीत झालं...

साऱ्या प्रश्नाचं कोड सुटलं...

कळलं तिला जीव लावणाऱ्या...

काळजानं आत्महत्या केली...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy