एक तारा निखळलेला
एक तारा निखळलेला
गुंफून श्वास माझे, जरी मी तुझे गीत गातो
बदलतील सूर वेडे, माझी प्राक्तने किती?
ठेचाळून तुझ्या अदेवर, मी ठार ठार मेलो
जखमांनी काळजाच्या, व्हावे पुराणे किती?
सुगंध इथल्या फुलांचा, अलिप्त मजहून राहतो
उरलेत वसंत माझे, असे उदासवाणे किती?
तपे उलटली श्वास मी तुझ्या आभासांवर घेतले
सांग अजून सोसावे दुःख, या प्रियकराने किती?
काव्यांनी माझ्या तुला, खूप उंच उंच नेले
झुकावे या प्रीतीत अजून, सांग नभाने किती?
तुला न दिसतो गगनात सार्या, तारा एकही दिवाणा
तुझ्यापरी इथे जळावे, मी दिव्याप्रमाणे किती?
क्षणात काही आता सरतील वाटा आयुष्याच्या
मला टाळायचे तुझे, उरले बहाणे किती?