STORYMIRROR

Varsha Shidore

Tragedy

4  

Varsha Shidore

Tragedy

आनंदाची भाकर...

आनंदाची भाकर...

1 min
23.4K

भाकरीचा प्रश्न युद्धासमान 

पोटासाठी सदा असे वणवण

रात्रं-दिवस कष्टात भटकंती 

तरी भासे अन्नाची चणचण 


उपाशीपोटी निजे तान्ही लेकरे 

तेव्हा तुटे जीव माय, बापाचा

चटके परिस्थितीचे असे बसता 

वाटे घोटावा गळा संघर्षाचा 


डोईजड सहनशीलता बांधलेली 

निर्दयीपणे दावणीला आयुष्यभर 

जिथे वासाचे आनंदात स्वागत 

तिथे महाग भाकरीस कणभर 


कष्टकरी अन्नदात्याचा अखेर 

तुटावा रोजच्या भटकंतीचा तिढा

फुटक्या चुल्हीवरच्या संसाराला 

निदान नशीब व्हावा हर्षाचा पेढा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy