कुठ भोगाल एवढं पाप !
कुठ भोगाल एवढं पाप !
गुरुजी कोरोना आला.... तसा माहा बाप कामावरुन रीकामा झाला.
लेकरासाठी काही भेटते का म्हनुण सैरावैरा धावला
आन पोलीसाच्या हातचा मार खाऊन रीकामाच घरी परतला.
होत नव्हत खरडुन खारडुन मायन मले जेऊ घातल
आन दोन घोट पाणी पिऊन माझा बाप उपाशीच झोपला.
आता कसं जगायचं, विचारच आला कंट्रोलच्या रांगेत घाम गाळत बसला.
कोणी म्हणे फुकट मिळते धान्य, कोणी म्हणे फुकट मिळते जेवन.
दिवसभर आशेवर जगला आणि पुन्हा रात्रि पाणी पिऊन निजला.
भल्या पहाटे उठला आण
मायले हाताशी घेऊन तुटकफुटक सामान बांधू लागला.
माया कडे पाहून जोरात हासला....
आन माझ्या पाठीवर हात ठेवतच पुटपुटला,
चाल बेटा गावाकड हित कोनी नाय आपल.
ह्या मुंबईच ताज म्याच बांधलं.
मोठया मोठ्या इमारती सांगुन राहिल खरं.
पांढ-या कपडे वाल्याच काही नाही खरं.
कवा दगा देईन त्यापरीस आपलं गावच बरं.
