STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Tragedy

4  

Sanjay Dhangawhal

Tragedy

*शहीद सैनिकाची व्यथा*

*शहीद सैनिकाची व्यथा*

1 min
358

खुप दिवसांनी मुलगा

घरी येण्याचा निरोप आला

आईबाबांना खुप आनंद झाला

बायकोसुद्धा त्याच्या भेटीसाठी

आतुर झाली

त्याचा फोटो पाहून गहिवरून गेली 


मुलाच्या आठवणीत

आईचे डोळे भरून आले

नजर तिची मुलगा येण्याच्या

वाटेकडे लागले

बाप ओट्यावर बसुन

मुलाची वाट बघायचा

कॅलेंडरवरचा एकएक दिवस खोडत जायचा

पप्पा घरी येणार म्हणून

परी नाचु लागली

आनंदात यालात्याल सांगु लागली


पण मुलगा येण्याचा दिवस टळून गेला

वाट बघण्यात महिना सरून गेला

मुलाचा फोनही लागत नव्हता

त्याच्या खुशालीचा संदेशही मिळत नव्हता

मुलाच्या प्रतिक्षेत

काळजी वाढली होती

त्याच्या येण्याची वाट

कुठे संपली होती


मुलाच्या भेटीसाठी जीव

साऱ्यांचा उतावीळ झाला असताना

अचानक मध्यरात्री 

फोनची बेल वाजली

मुलगा सिमेवर शहीद झाल्याची

बातमी कानावर धडकली

आईचे काळीज फाटले

बापाने डोळे मिटले

त्याच्या बायकोने

मंगळसूत्र मुठीत घट्ट धरले

कुंकू लावलेले कपाळ

शेवटचे आरशात पाहीले

त्या देवाला जराही दया आली नाही

लाडावलेल्या परीलाही

पप्पांना भेटता आले नाही


आईच्या भेटीसाठी

धावतपळत येणारा मुलगा

तिरंग्यात लपेटून शवपेटीत आला

भारतमातेच्या कशीत

कायमचा निजला

जड अंतकर्णाने  मुलाच्या तेरवीला त्याची पेटी उघडली

त्यात आईसाठी घेतलेली शॉल निघाली

बायकोच्या आवडीची साडी पाहून

तिने हंबरडा फोडला

जॉकेट पाहून बापाचा कंठ दाटला

परीने बाहुलीला कडकडुन मिठी मारली

आभाळाकडे पाहून पप्पांना

सॅल्युट करू लागली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy