आद्य परिचारिका
आद्य परिचारिका
जगभर पेटला दुसऱ्या
महायुद्धाचा वणवा
युद्धात सैनिकांची पडू
लागली वानवा
युद्धापेक्षा जखमांनी
सैनिक मरु लागले
जिंकून देखील त्यांचे
सैन्य असे हरू लागले
युद्धभूमीवर अवतरली
तेव्हा एक देवदूती
सेवा करूनही सैनिकांची
ती पावली ख्याती
दिवसातच नाही तर रात्री
देखील करूनी त्यांची सेवा
लष्करात रात्री फिरत
होती हातात घेऊन दिवा
मोठा विरोध झाला
परंतु नाही ती डगमगली
जगाला रुग्णसेवेची
नवी दिशा दाखवली
लेडी विथ लॅम्प असे
पद मिळाले तिला
दर आणि सन्मान
आपोआप मिळू लागला
फ्लॉरेन्स म्हणजे एक
सुंदर नाजूक फूल
नाईंटींगेल म्हणजे
गाणारा बुलबुल
अशी केली तिने सेवा
रुग्णाईतांची
नव्हती जरी आशा
मानसन्मानाची
नाजूक सुंदर कोमल
ह्दयी ही सेवेची सेविका
सारेजण म्हणती तीला
आद्य परिचारिका
