STORYMIRROR

Vishal Puntambekar

Inspirational Others

3  

Vishal Puntambekar

Inspirational Others

आदर्श सामाजिक राहणीमान

आदर्श सामाजिक राहणीमान

1 min
174

पाण्यासाठी एकत्र जेव्हा आलो

उत्तरे समस्यांची मिळू लागली

एकत्र जर असेच राहिलो

जीवनशैली होईल चांगली


विभागून कितीही वापरा शक्ती

नाही मिळणार तुम्हाला दाद

एकत्र होऊन कराल युक्ती

समस्यांची तुमच्यापुढे काय बिशाद


आलो एकत्र आपण राहण्यास

मंत्र स्वच्छतेचा तुम्ही पाळा

त्रास दुसर्याला न होऊ देण्यास

जुन्या वाईट सवयी टाळा


एकमेकां करा तुम्ही साह्य

विचार नको वैयक्तिक

कोणालाही नका धरु ग्राह्य

होऊन कधी अगतिक


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational