STORYMIRROR

Jyoti gosavi

Classics Others

4  

Jyoti gosavi

Classics Others

आधुनिक युगाची नारी

आधुनिक युगाची नारी

1 min
304

उठ ग बायो चार

 चा गजर झाला

आधुनिक युगाची नारी

 तू 06:40 ची लोकल

 पकडायची तुला

त्याआधी सर्वांसाठी

 जेवण तुला राधांयचंय 

 काळ काम आणि वेगाच

 गणित तुला सांधायचंय

मुलांचे सारे आवरायचं

 पतीदेवाला उठावायचं 

बेबी सार आवरून तिला

 पाळणाघरात सोडायचं

 या सर्वातून तुला वेळच

 नाही स्वतःकडे बघायला

 उठ ग बायो चारचा

 गजर झाला

आधुनिक युगाची नारी

 तू 06:40 चे लोकल 

पकडायची तुला


ऑफिस मध्ये आठ 

 टेन्शन तुला कामाचं

त्यातूनही सर्वांशी कसं

 जोडतेस नातं प्रेमाचं

संध्याकाळी गाडीत जागा

 मिळेल की नाही

आज भाजी कोणती करू

 यांना ही आवडत नाही

स्वयंपाक करता करता

 मुलांचं होमवर्क घ्यायचे तुला

बेबीला ताप आलाय

 डॉक्टर कडे न्यायचे तिला

उठ ग बायो चार चा 

गजर झाला

आधुनिक युगाची 

सावित्री तू 06:40 ची

 लोकल पकडायची तुला


घरातली लढाई लढताना

 जातेस घरी दमून

 सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी 

आणतेस मात्र जमवून

इतरांची सरबराई करताना

 जणू तू अष्टभुजा असतेस

 पाहुण्यांचे स्वागत 

तू हसत मुखाने करतेस

 जिवलगांवर संकट येता

 दुर्गामाता देखील बनतेस

 लोक फक्त कळसा

 कडेच बघतात

 विसरतात पायरीच्या दगडाला 

आधुनिक युगाची सावित्री

 तु 06:40 ची लोकल

 पकडायची तुला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics