आभास हा
आभास हा
केव्हाची आस घेऊन बसलो आहे
केव्हा ची साद देऊन बसलो आहे
तुझ्या येण्याची वाट पाहतो आहे
तुझ्या भेटीसाठी जीव आसुसला आहे------
तूझ्या त्या निरागस डोळ्याची बाहुली
पापण्यात स्वतःला नकळत लपवत आहे
इतके काय लाजायचे गं
मी तुझा नि तू माझीच ना गं------
तुझे नयन बावरे भुलवतात मला
तुझ्या अस्तित्वाची स्वप्नं दाखवतात
तेव्हा माझा न मी राहतो
आपल्या प्रणयाच्या स्वप्नात रंगून जातो------
तुझे नाजूक रेशमी बाहूंचे हार
मला सारखे सारखे आठवत असतात
प्रितीच्या बंधनात अडकण्यासाठी विनवत असतात
जिकडे तिकडे तुझाच भास करत असतात-------
येना गं,तू लवकर जवळी
पाहू दे तुला अशी डोळे भरुनी
तुझ्या केवळ दिसन्यातही मला सुख आहे
त्यातही तुझ्या माझ्या मिलनाचा आभास आहे-------

