STORYMIRROR

Vinay Dandale

Inspirational

4.6  

Vinay Dandale

Inspirational

आभाळझरा ,,,,

आभाळझरा ,,,,

1 min
569


आभाळझरा ....!

'''''''''''''''''


सावकाराच्या आसनस्थ

तिजोरीचा कप्पा

अन

माझ्या बापाच्या फाटक्या

बांडीसाचा खिसा

जमीन अस्मानचा फरक आहे

यात ....


सावकाराच्या

तिजोरीच्या कप्प्यात

कोऱ्या कोऱ्या

गांधीजींचा फोटो असलेल्या

लहान मोठ्या नोटा

व्यवस्थित रचलेल्या ....


माझ्या बापाच्या

फाटक्या बांडीसाच्या खिशात

घड्या पडलेली सातबाराची पानं

सोबत

अंगठा लावलेला कोरा कागद ....


माझ्या डोळ्यात तरंगतोय

सावकाराचा मिश्किल हसरा चेहरा

अन

माझ्या बापाच्या पापण्यात

आभाळझरा ....!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational