STORYMIRROR

Sarika Jinturkar

Fantasy Others

3  

Sarika Jinturkar

Fantasy Others

आभाळ

आभाळ

1 min
268

चाहूल लागताच पावसाची  

आभाळ भरुन आलं 

काळ्याकुट्ट ढगांनी 

रम्य सायंकाळ अन् सोनेरी किरण 

आसमंत जणू दुमदुमला आनंदानी


गच्च दाटलेलं आभाळ त्यात पाऊस मुसळधार 

शिवार दरवळे नव्या सुगंधानी  


आभाळातल्या चांदण्या थेंबाच्या

 रूपाने अलगद जमिनीवर येई 

 धरणीला हिरवेगार करी जणू नटलेल्या पाचूंनी  


कधी निळे कधी काळे तर कधी अलगद

लाल-केशरी झाकून धरणीला हे बरसे ओल्याचिंब सरींनी 


 चिमणी पाखरे मुक्तपणे आभाळभर फिरे 

पाऊस पडू लागल्यावर हळूच घरट्यात शिरे

 गाणे गात असे मधूर कंठानी ....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy