STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

1625 महादेव मी पाहिले

1625 महादेव मी पाहिले

1 min
26.9K


एक सोमवार मी आज निवडला

सहा दिवसांचा आढावा घेण्यासाठी

दोन कवितांचा फतवा पाळताना

पाच ही तत्वांचा मागोवा घेतला

म ला जरा नवल वाटले

हा कसला अनुभव मला आला..?


दे व आहे नाहीच्या वादात

व णवण का उगाच मी केली...?

मी नित्य नियमाने काव्याभिषेक केला

पा वन पवित्र शब्दसुमनांची

हि रेरीने ओंजळ रीती केली पण

ले करास पाहण्या साठी

एकाही महादेवाने डोळे नाही उघडले

आणि खरोखरच तो नाही

याची खात्री पटली....!


पालथ्या घड्यावर पाणी

असे गुरुजी टोमणे मारायचे

ते असे का म्हणत होते ते आता पटले

आणि मीही त्यातलाच आहे की काय

असे मनोमन वाटू लागले

मन उद्विग्न झाले


म्हंटले आज लेखणीला सांगावे

बाई तू जरा मौनाचा आधार घे

उगाच पाझरू नको

अजूनही आपल्या कडे

वाचन संस्कृती जिरविण्यासाठी

वाचन फौंडेशन कपाची सोय झालेली नाही


ती हसली आणि गप्प झाली

मी हळूच टोपण लावले

कदाचित शाई संपली असावी

किंव्हा ती रुसली असावी....!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational