Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Drama Tragedy

3.5  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Drama Tragedy

घर फुटू नये स्त्रीमुळं..

घर फुटू नये स्त्रीमुळं..

2 mins
182


लग्न होईपर्यंत एका घरात राहणारे भाऊ भाऊ लग्नानंतर वेगळे होतात... एकाच आईच्या पोटी जन्म घेऊन घर फोडण्याची वेळ आपल्यावर येईल. आई-बापाची वाटणी करण्याची वेळ येईल असं कधी कुणाला वाटत नसतं तरी पण तसंच घडतं...बाप एकाकडे,आई दुसऱ्याकडे... जगात हेच घडतंय म्हणून याचं काही नवल ही उरलं नाही..का ? तर सगळीकडे सारखेच नवल ते कसलं ?


दोन सख्खे भाऊ लग्नानंतर एका घरात राहूच शकत नाहीत.सरळ सरळ वाटणी..दोघांत एक भिंत हवीच...का ?तर कोणी कोणाचे तोंड बघायचं नाही... कोणी कुणाला बोलायचं नाही की, ऐकायचं नाही...


घर दार, शेती बाडी त्याबरोबरच आई बापांची वाटणी...

म्हणे एका आईच्या पोटी जन्म घेतला... लग्नानंतर एकमेकांच तोंड पहाणे नको...


हेवा दावा,रुसणे फुगणे,आळ घेणे टोमणे मारणे विनाकारण आगपाखड करणं द्वेष,मत्सर हट्ट ,स्वार्थ,नी स्वैराचार या पोटी सासू सुना, जावा जावा,नंणंद भावजया यांच्यात नको तिथं, नको तेव्हा ठिणगी पडते, धुमसत जाते नी अशी आग लागते की विझता विझत नाही..होतं काहीच नाही पण हवं त्याला हंव तसं राहता येत नाही... मानसन्मान,,इगो दुखावला जातो नी उरतो तो एक पर्याय जमतं नाही तर एका घरात राहायचे कसं ? मोठा, खूप मोठा प्रश्न निर्माण होतो सुटता सुटत नाही...मार्ग उरतो फक्त एकच वेगळं व्हायचं, वेगळं राहायचं...


घरदार शेती बाडी सर्व वाटणी बरोबर हवी ,आई बापांची वाटणी ती ही बरोबर हवी .. दोन्ही एकाकडे नाही...एक एकाकडे.एक दुसऱ्या कडे, माय एकाकडे,बाप दुसऱ्या कडे असंच हवं.. कारण जगाची रीत...


लग्नापूर्वी दोन भाऊ वेगळे का राहत नाहीत? लग्न झाल्यावर हे असं का? प्रश्न मोठा आहे.. उत्तर शोधतोय,शोधतच राहतोय उत्तर काही सापडेना... पण स्त्रीनं पती, सासू , सासरे सर्व परीवाराचा योग्य तो मानसन्मान राखला थोडं सोसलं,घरपण जपलं तर ते घर एक मंदिर असेल...

सुन म्हणून आलेल्या नविन सुनेचे माहेर प्रमाणे कोडकौतुक होणार नाही... हवं ते हवं तेव्हा मिळणार नाही हैस,शान शौक पुर्ण व्हायला थोडा वेळ जरूर लागेल पण ती ह्या परिवाराचा एक घटक आहे,या परिसरातील सर्व सदस्यांप्रमाणे ती एक आहे...तिची संवेदना, भावभावनां जपली गेली पाहिजे...तिचे कोडकौतुक झाले पाहिजे.. तिच्या ईच्छाअकांक्षा पुर्ण झाल्या पाहिजेत... शेवटी घराचं घर पण जावं...भाऊ भाऊ असावा...घर एक मंदिर असावे...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract