Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

kanchan chabukswar

Thriller

4.0  

kanchan chabukswar

Thriller

अशीच एक रात्र होती

अशीच एक रात्र होती

7 mins
460


श्वेता एक एडिटर म्हणून काम करत होती. छोट्या फिल्म, मोठ्या फिल्म, एडवर्टाइजमेंट, किंवा काही जिंगल्स, या सगळ्यांवर ती तिच्या कंपनीतर्फे ती एडिटिंगचे काम करे. फिल्म इन्स्टिट्यूट डिप्लोमा घेतल्यानंतर आई-वडिलांचा विरोध असूनही तिने एडिटिंग मध्ये काम करायला सुरुवात केली होती. आई-वडील दुबईला म्हणून ती आपल्या आजी आजोबांबरोबर ठाण्यामध्ये तीन हात नाका जवळ राहिली होती.


एडिटिंगचे काम ही फारच किचकट आणि कठीण असायचे, 36/40 तासाची फिल्म 2 तासाची करायची, किंवा काही जाहिराती या तास-तास शूट केले त्यांना काही सेकंदाची करायचे, त्याच्यामध्ये जाहिरातीचा मतितार्थ ठेवायचा आणि आजूबाजूच्या नको असलेल्या गोष्टी शोधून कापायचा. एकदम कसबी काम होतं. पैसेही भरपूर मिळायचे. बाकीच्या लोकांसारखा नऊ वाजता ते पाच वाजता चा जॉब नव्हता तर जेव्हा केव्हा स्टुडीओ मिळायचा तेव्हा तिला 18 ते 20 तास काम करून दिलेलं काम संपवावं लागे. मग तिथे वेळेचं काहीही बंधन नसायचं. सकाळी दहा वाजता सुरुवात झाली की रात्री दहा-अकरा किती पण वाजायचे. आजी-आजोबांच्या डोक्याला मात्र एक घोर- घोर लागलेला होता.


श्वेता घरी परत येऊपर्यंत आजोबा आणि आजी हॉलमध्ये किंवा कॉलनीचे प्रवेशापर्यंत येरझाऱ्या घालत राहायचं. 27 वर्षांची श्वेता लग्नाला अजूनही तयार होत नव्हती. तिचं म्हणणं तिला आयुष्यामध्ये काहीतरी मिळवायचे होते आणि मगच लग्न करायचे होते. लग्नाचं वय उलटून चालले होतं.

आजीचे म्हणणे,"एकदा का तुमची मनोवृत्ती पक्की झाली की दुसऱ्याच्या घरांमध्ये सामावून घेणे फार कठीण जातं." 27, 28 वर्षाच्या मुलीला दुसऱ्याच्या घरांमध्ये कसं काय अॅडजेस्ट करता येणार आणि मुलगी 28 वर्षांची तर मुलगा तर पस्तीशीचा.

आजीचे म्हणणे, "अर्धे आयुष्य उलटून गेल्यावरही लग्ना चा तरी काय उपयोग?"


आता एडिटिंग काम मुंबईमध्ये असायचे यातून त्यांचा स्टुडिओ परळ या भागांमध्ये. कधी अंधेरीचा स्टुडिओमध्ये, किंवा काही स्टुडिओ तर कांदिवलीला पण असायचे. जो स्टुडिओ कंपनी बुक करेल तिथे जाऊन तिला काम करावे लागे. सगळं काही सेफ असायचं, कंपनीचं, वातावरण एकदम खेळीमेळीचं आणि निरोगी. त्याच्यामुळे काम करायला श्वेताला मजा येई. त्यातून पैसे भरपूर मिळतात, प्रत्येक जाहिरात, पॉकेट मूव्ही, किंवा मोठ्या मूव्हीज, त्यांच्या वेळेप्रमाणे तिथे मानधन वाढत जाई.


सगळे काम डोळ्याचे-कानाचे, आणि स्वतःच्या क्रिएटिव्हिटीचे. काहीतरी कल्पनाशक्तीला वाव, तसेच काम करण्यासाठी पूर्ण मोकळीक असल्यामुळे श्वेताला एडिटिंगचे काम खूप आवडत असे. म्हणतात ना प्रसिद्धीचे एकदा चटक लागली किती सुटत नाही. प्रत्येक फिल्ममध्ये नामावलीमध्ये नाव एडिटर म्हणून झळकायला लागले होते, आणि ते बघण्याची तिला अतिशय चटक लागली होती. 2020 चे वर्ष, कोरोना महामारीनं जगाला त्राहीत्राही करून सोडले होते. कुठेही फिल्मचे काम नव्हते. त्यातून आता नवीन जाहिरातींचे काम चालू झाले. मिळेल ते काम पदरात पाडण्यासाठी श्वेता उत्सुक होती. एका विदेशी कंपनीचे जाहिरातीचे काम तिला मिळाले होते. स्टुडिओ परळचा होता. त्यामुळे आठ दिवसांमध्ये तिला आपले काम पूर्ण करायचं होतं. भीतीमुळे कोरोनामुळे रस्त्यावर काहीही गर्दी नसायची, आणि बाकीच्या मंडळींनी कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी म्हणून हे काम सोडून दिले होते. म्हणूनच हे जाहिरातीचे काम श्वेताला मिळाले.


आजी, आजोबा नको नको नको म्हणत असताना, श्वेताने परळला जाण्याची सुरुवात केली. उबर, ओला टॅक्सी, किंवा अजूनही खाजगी टॅक्सी रस्त्यावरती धावत होत्या. टॅक्सी करून जाईन असं श्वेताने ठरवलं होतं. लोकल ट्रेन बंद, कुठलाही मार्ग तिच्यापाशी नव्हता. झाले तर, सोमवार, मंगळवार, बुधवार व्यवस्थित काम चालू झाले. सकाळी 10 वाजता काम सुरू करून ती संध्याकाळी सहा वाजता घराच्या दिशेने निघायला लागायची.

आज शुक्रवार, कालच प्रोड्युसर-डायरेक्टरने श्वेताला योग्य त्या सूचना दिली असल्यामुळे ती त्याप्रमाणे जाहिरातीवरती शेवटचा हात फिरवत होती. वेळेचं भानच राहिलं नाही, आठ वाजून गेले नऊ वाजून गेले, मनासारखं काम संपलं नव्हतं, आजीला फोन केला की उशिरा घरी येईन.


श्वेता परत कामाला लागली. शेवटी मनाजोगतं काम व्हायला रात्रीचे अकरा वाजले. व्हिडिओमध्ये आता फक्त वॉचमन आणि एक लेडी अटेंडंट एवढेच होते. थोडीशी भीती वाटली, नेहमीचे लोक असल्यामुळे तिने भीती बाजूला सारली. एडिट झालेली फाईल पाठवून श्वेताने आपला लॅपटॉप आणि बाकीचे कम्प्युटर्स बंद केले. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता, श्वेताने उबर टॅक्सी ऑर्डर केली, आणि त्याची वाट बघत स्टुडिओच्या बाहेर येऊन उभी राहिली. पावसाचा जोर वाढू लागला होता. टॅक्सी आली, वॉचमनने टॅक्सीचा नंबर आणि ड्रायव्हरचा नंबर लिहून घेतला, श्वेता टॅक्सीत बसली आणि निघाली. अतिशय दमल्यामुळे तिचे डोळे मिटत होते. आता पावसाचा जोर पण वाढायला लागला होता. तिला मनातून थोडी भीती पण वाटायला लागली, पण स्वतः कराटे चॅम्पियन असल्यामुळे तिने आपल्या मनातली भीती काढून टाकली.

आजोबांचा फोन आला,"अगं किती उशीर झाला? मी येऊ का घ्यायला?"

तिने आजोबांना टॅक्सीचा आणि ड्रायव्हरचा नंबर दिला आणि म्हणाली,"काळजी करू नका मी घरी येते."


टॅक्सी आता एक्सप्रेस हायवेला लागली होती. ड्रायव्हरने तिला सांगितले की अर्ध्या तासात आपण घरी पोहोचतो आहोत. टॅक्सीने दादर सायन ओलांडून घाटकोपरच्या रस्त्याला लागली होती. घाटकोपर फटाफट ओलांडून टॅक्सी पुढेपुढे धावत होती. आता पावसाने चांगलाच जोर धरला होता.

अचानक ड्रायव्हरला ओरडला,"संभालो मॅडम" कर्कश्श आवाजात टॅक्सी वेडीवाकडी होत पडत रस्त्याच्या कडेला येऊन उभी राहिली. पावसाने जोर धरला होता, बाहेर काही दिसत नव्हतं, अंधारही काळा काळा काळा.

श्वेताने ड्रायव्हरला विचारले की टॅक्सी का थांबवली ?

ड्रायव्हरने जे सांगितले त्याच्यामुळे श्वेताच्या त्याच्या पायाखालची जमीनच हादरली. मागचा टायर पंक्चर झाला होता आणि एवढ्या पावसात आता पंक्चर झालेला टायर बदलून दुसरा टायर लावायचा होता. अजून अर्ध्या तासाचा विलंब. वेळेचं काही नाही पण आता श्वेताला धडधडायला लागलं होतं. काळामिट्ट अंधार कोसळणारा पाऊस आणि ती एकटी. पैसे, एका बाजूला पण आता तर तिला वाटायला लागलं की ती घरी तरी जाते की नाही? वर्तमानपत्र आणि टीव्हीमधल्या येणाऱ्या वाईट बातम्या आठवायला लागल्या. परदेशात असलेले आई-वडील, घरी असलेल्या वृद्ध आजी-आजोबा, काय म्हणून तिने अशी रिस्क घेतली होती?


सगळ्यांनी तर तिला मूर्खातच काढले असते. जाहिरातीचे एक-दोन दिवस उशीर! काय बिघडले असते? तिचं जीवन महत्त्वाचे होते की पैसे? का काम? सगळे विचार मनामध्ये तरळून गेले.

ड्रायव्हरच्या लक्षात चलबिचल आली. "मॅडम! मॅडम जी बाहर आकर मेरी मदत कीजिये." ये टॉर्च अपने हाथ मे पकडलो."

ड्रायव्हरनं तिला आपली छत्री आणि टॉर्च दिला. हायवेच्या आडबाजूला उभे करून त्यांनी आपले काम करायला सुरुवात केली. त्याच्यावरती आणि स्वतःवरती छत्री धरून श्वेताने टॉर्चचा लाइट टायरवरती धरला. बाजूंनी दोन-तीन गाड्या पाणी उडवत निघून गेल्या, कोणीही थांबलं नाही. अचानक अजून एक टॅक्सी आली आणि बाजूला येऊन थांबली, आता मात्र श्वेता पूर्ण घाबरली, हे दोघे मिळून काही करतात की काय? तिच्या पर्समध्ये ठेवलेल्या बारीक दोरीची, आणि चाकूची तिला आठवण झाली. तिची बॅग तर गाडीमध्ये होती. पण उतरताना तिने खिशामध्ये मोबाईल आणि छोटी पर्स ठेवली होती. वेळ आली तर ती स्वतःला वाचवून पळून जाणार होती.


दुसऱ्या टॅक्सीचा ड्रायव्हरनं काही मदत पाहिजे का विचारले? दोघेजण बिहारी ढंगामध्ये हिंदीमध्ये बोलत राहिले. दुसऱ्या ड्रायव्हरनं श्वेता कुठून येते आहे हे पण विचारले. कुठे चालले आहे? आणि तो पण तिला घरी घेऊन जाऊ शकतो हे पण सांगितले. बाजूने एक पोलीसची व्हॅन गेली. काय माहिती पण श्वेताने आपले तोंड लपवून घेतले. थोड्या वेळाने दुसरा टॅक्सीवाला निघून गेला. दहा मिनिटांमध्ये ड्रायव्हरने टायर बदलले, ड्रायव्हर आता पूर्ण ओला झाला होता. श्वेता पण एका बाजूने पूर्ण भिजली होती. दोघेजण गाडीमध्ये बसले. ड्रायव्हरने आपला थर्मास उघडून श्वेताला आणि स्वतःला चहा ओतून घेतला. त्यांनी तिला प्रेमाने विचारले,"मॅडम आपको भूक लगी है तो मेरे पास उबले हुये अंडे है. खा लीजिये." माहित नाही का, पण श्वेता चहापण प्यायली आणि अंडपण खाऊन घेतलं. हे सगळं काही अनपेक्षित होतं. कोसळणारा पाऊस, पंक्चर झालेली गाडी, वाटणारी भीती, मनाची होणारी चलबिचल.

   

गाडी सुरू करून ड्रायव्हरने तिच्या घरी जाण्याचा रस्ता पकडला. श्वेताने त्याचे धन्यवाद मानले. ड्रायव्हर म्हणाला,"डरना नही दीदी, टॅक्सी चालवणं हे माझं तर कामच आहे आणि माझ्यापासून तुम्हाला कसलीही भीती वाटू देऊ नका. माझ्या घरी माझी बायको आहे छोटी छोटी मुले आहेत. मी त्यांच्यासाठी हे काम करतो. मी जर काही वेडंवाकडं केलं तर मी जेलमध्ये जाईन आणि माझी बायको आणि मुलं उघड्यावर पडतील ते मला मंजूर नाही. कोणी माझ्या बायकोबरोबर वेडंवाकडं वागलं तर मी जिवंत पण राहू शकणार नाही. मग मी बाकीच्या मुलींबरोबर वाईट कसा वागू? देव आहे आणि तो सगळं बघतो आहे. सध्या आम्हाला कोणी गिऱ्हाईक नाही, त्याच्यामुळे मिळेल ते भाडं आम्ही स्वीकारतो आणि कितीही दूर जायचं असेल तरी जातो.

माझ्या टॅक्सीमध्ये तुम्ही अगदी सुरक्षित आहात."

"रोज रात्री कामावर येताना माझी बायको मला चहा आणि उकडलेली अंडी करून देते. कधी मी रात्र-रात्र टॅक्सी चालवत आहे कारण भाडं जास्त मिळतं. आम्ही बिहारी लोक आहोत म्हणून इथे आम्हाला जास्त काम देण्यास लोकं संकोच करतात, पण आम्ही पण मेहनत करतो ना आणि हा देश तर आपल्या सगळ्यांचा आहे आणि त्यामुळे तुम्ही माझी बहीण आहात."


श्वेताची जीभ जणू टाळ्यालाच चिकटली होती. तिच्या डोळ्यांमध्ये शरमेने आणि आनंदाने अश्रू आले होते. टॅक्सीने ठाण्यामध्ये प्रवेश केला, आणि हळूहळू तिच्या कॉलनीपाशी आली. आजोबा आणि आजी कॉलनीच्या गेटपाशी छत्री धरून उभे होते. श्वेताच्या पोटात एकदम कळवळले. तिच्या मनात विचार आला,"मला काय अधिकार आहे या वृद्ध मंडळींना एवढा त्रास द्यायचा?" आज जर काही झालं असतं... माझ्यावरती वेडावाकडा प्रसंग आला असता तर हे दोघे मरूनच गेले असते." श्वेताने मनाशी खूणगाठ बांधली, याच्यापुढे वेडेवाकडे धाडस करणार नाही.


टॅक्सी थांबली, श्वेता उतरली, आजीने श्वेताला मिठी मारली. श्वेता म्हणाली,"आजी तुला अजून एक नाते मिळाले बघ." तिने ड्रायव्हरकडे निर्देश केला आणि म्हणाली," आजोबा हा तुमचा नातू आणि माझा भाऊ. यांनी मला अतिशय सांभाळून व्यवस्थित घरी आणले."


आजोबांनी स्वतःच्या गळ्यातली साखळी काढून ड्रायव्हरच्या गळ्यात घातली. श्वेताने ठरलेले भाडे आणि दोन हजार रुपये वरती दिले. ड्रायव्हर नको नको म्हणत असताना जबरदस्तीने आजोबा आणि श्वेताने त्याला भेटवस्तू घ्यायला लावल्या.

 आजोबा म्हणाले,"तुझा चांगुलपणा तुला खूप मोठं करेल आणि परत एकदा विश्वास झाला की जगामध्ये चांगली माणसंपण आहेत."

मंद हसून आजी श्वेताला म्हणाली,"आता ह्या तुझ्या अनुभवावरती एखादी फिल्म कर बरं."

दोघीजणी गळ्यात पडून हसल्या, आजोबांनी दोघींच्याही खांद्यावर हात ठेवले आणि घरी घेऊन आले.

################################################################################


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller