वाट
वाट
पवित्र नात्याच्या बंधनात बांधून
मंगळसुत्राच्या गाठित अडकवून
निघून गेले सीमेवर एकटे सोडून
जीव कोमेजला अर्ध्यावर स्वप्न मोडून
फौजी कधी येणार तुम्ही परतून...
सौभाग्य तुम्ही माझे धनी म्हणून
कपाळी लावीते कुंकू अभिमान बाळगून
देशाचा तिरंगा उंच हवेत फडकवून
भारत मातेच्या शत्रूंचा नाश करून
फौजी कधी येणार तुम्ही परतून...
झाले महिने वाट सारखी बघून
फोटोतही चेहरा दिसत नाही उमटून
स्वप्नातही सावली सारखी पाहून
डोळेही आतुरले घड्याळीचा काटा अडकवून
फौजी कधी येणार तुम्ही परतून...
