प्रेमाचा त्रिकोण
प्रेमाचा त्रिकोण
दुहेरी दुनियेत विभाजन झालं
हात सुटल्यावर एकटंच राहिलं
डोळ्यातलं पाणी डोळ्यातंच आटलं
एकतर्फी प्रेम ओंजळीत आलं
माझ्या मनावर एकच नाव कोरलं
तुझ्या मनात दुसरं कोण गुंतलं
जीव माझं तुझ्यात विणलं
सोबत तू दुसऱ्यालाच बांधलं
एकतर्फी प्रेम ओंजळीत आलं
डोळ्यातलं पाणी डोळ्यात आटलं
मी तुला माझं समजलं
पण ते कधी माझं नव्हतं
खरं प्रेम भेटायला नशीब लागतं
पण नशिबातच खरं प्रेम नव्हतं
एकतर्फी प्रेम ओंजळीत आलं
डोळ्यातलं पाणी डोळ्यात आटलं
तुझं माझं नाही सरलं
काळीज आठवणीत ढसाढसा रडलं
तुझ्या आनंदात माझं प्रेम उरलं
तुझ्यासाठी माझं प्रेम दिलं
डोळ्यातलं पाणी डोळ्यात आटलं
एकतर्फी प्रेम ओंजळीत आलं
