नाही रे
नाही रे
उमललेल्या चमेलीचा सुगंध तो नाही रे
टवटवीत चाफ्याचं हसू ते नाही रे
लाजाळूच्या झाडाला लाज आता नाही रे
मी तुझी पण तू माझा नाही रे
पहीले सारखं प्रेमजाळ आपल्यात नाही रे
मंद गतीचा प्रवाह तो नाही रे
वाहून गेल्या भावना त्या नाही रे
बंधारे नदीचे सुटेल की नाही रे
मी तुझी पण तू माझा नाही रे
पहीले सारखं प्रेमजाळ आपल्यात नाही रे
सरपटणाऱ्या पायवाटा सरळ दिसत नाही रे
मार्ग सोपा आहे पण वळण नाही रे
वाटेत गडलेले काटे निघेल की नाही रे
मी तुझी पण तू माझा नाही रे
पहीले सारखं प्रेमजाळ आपल्यात नाही रे

