सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले
1 min
295
काटेरी झुडपातून जातांना
भयभीत ती झाली नाही
अपमानाच्या गर्दीत जातांना
ती मुळीच डगमगली नाही
अनिष्ट चालीरीतीचा नाश केला
मानाचं स्थान स्त्री जातीला दिला
दिशा मिळाली दिशाहीन समाजाला
जेव्हा सावित्रीबाई फुलेनी
सर्वत्र ज्ञानाचा सुगंध पसरवला
विरोधकांना कायमचा दिला झटका
क्रांतीज्योती पहिली महिला शिक्षिका
गुलामीच्या पिंजऱ्यातून केली सुटका
आज उजळली प्रत्येक अशिक्षित बालिका
