STORYMIRROR

Manisha Vispute

Inspirational

3  

Manisha Vispute

Inspirational

हरितक्रांती

हरितक्रांती

1 min
313

समृद्धीचा साज

हिरवा रंग हरितक्रांतीचा

पालवी फुटे नव्याने 

आनंदाने फुलण्याचा...


पौष्टीकता पालेभाजीत

कारले,शराळी, भेंडी-गवार

आरोग्यदायी रंग देखणा

जीवनात आणी बहार...


चैतन्याचे पांघरुण

त्याला मायेची झालर

हिरवाईत दिसे

सृजनाचा पाझर...


निसर्गाचे सौंदर्य खुले

वृक्षवल्लींच्या पानांतून 

फुलांची नक्षी सजे

मखमली शालूवरुन...


अस्तित्वाची दिसे खूण

करता स्वप्नांची पेरणी

आयुष्य होई हिरवेगार

देता कष्टाची फवारणी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational