निर्झर मायेचा..!
निर्झर मायेचा..!
भरून
ऊर आलेला
पान्हा परी तिचा
तान्हुलीच्या स्पर्शाविना जळालेला..!!
बाप
हट्टाला पेटलेला
चिमुकली वसे उदरी
म्हणून सैतान तो झालेला..!!
तान्ह्या
जीवावर उठलेला
नको धोंड गळ्यात
जबरदस्तीने दवाखाना गाठलेला..!!
गदारोळ
पुन्हा माजलेला
मातृत्वाला मुरड घालून
धाकाने अंकुर पोटातच खुडलेला
वेदनांचा
धडा गिरवलेला
पुन्हा कासावीस जीव
आभाळमायेचा निर्झर उरी गोठलेला..!!
