पहिलं प्रेम😙😍
पहिलं प्रेम😙😍
मन चालले चालले
माझ्या प्रियकराकडे
कधी पडेल दृष्टीस
कुणा घालू गं साकडे ||
भासे चंदनापरी मंद
ज्याच्या प्रीतिचा सुगंध
आस लागता भेटीची
मन माझे होई धुंद ||
बालपणीचा तो सखा
आठवे गं क्षणोक्षणी
मयुरपंखी त्या क्षणांची
करी मन उजळणी ||
प्रेम आमचे मंगल
त्यात नसे स्पर्श भाषा
राखे तनाचे पावित्र्य
लाभे मनाला आरसा ||
दिवाकर पृथ्वी परी
नाते आमुचे विमल
योग्य राखुनी अंतर
ठेवू जगता शितल ||
निराशामय या जगी
तु रे आशेचा किरण
रम्य प्रहरी घडे जैसे
सूर्य पृथ्वीचे मिलन ||

