STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Classics

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Classics

सिक्सर किंग

सिक्सर किंग

1 min
386

क्रिकेट विश्वातला तारा

युवकांचा होता युवराज

ज्याने मिळविले होते

षटकारावर अधिराज


क्रिकेटमधून संन्यास घेतांना

तो झाला खूपच भावुक

राष्ट्रासाठी त्याने खूप खेळला

त्याला निश्चित आहे ठाऊक


त्याने जिंकून दिले आहेत

अनेक सामने भारताला

त्याच्या निडर खेळांवर

अभिमान आहे आम्हांला


आज ही आठवतो खेळ

एका षटकात मारलेले सिक्स

क्रिकेटचा खरा युवराज

तुझ्यासारखा तूच आहे फिक्स


भविष्यात तुझ्यासारखा

खेळाडू होणार नाही

मैदानावर तुझ्यासारखी

कोणाची बॅट तळपणार नाही


क्रिकेटमधून संन्यास घेतला

तरी सदा आठवण सोबत असेल

तुझे मागील सामने पाहून

तुझा प्रशसंक सदा आनंदी दिसेल


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন

Similar marathi poem from Classics