निळा तरंग
निळा तरंग
निळा रंग तो कन्हैयाचा
रंगही निळा रामाचा
आणि प्राशुनी हलाहलाते
कंठ निळा श्रीहराचा
निळे निळे बुद्धाचे मुख
पाहुनी वाटते कौतुक
अंतर्मन ते होते मुक
दैवी आहे ऊर्जा ही एक
कधी उतरते धरणी वरती
आकाशाची निळी निळाई
अलगद मूरते सागरात
रंगत जाते निळी झिलाई
कधी वाटते मजला स्वतःच
व्हावे सानुली नीलपरी
अलगद मिटूनी घ्यावे
निळ्या कमळाच्या अंतरी
कन्हैया च्या भक्ती
मध्ये रंगते अंतरंग
आणि पसरती अंगावरती
निळे निळे दैवी तरंग
