STORYMIRROR

Gauri Ekbote

Romance

4  

Gauri Ekbote

Romance

प्रेम म्हणजे…………… प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे…………… प्रेम म्हणजे

1 min
12.8K


सतत तुझा विचार कारण प्रेम असत

मला बघून तीच लाजणं

प्रेम नाहीतर काय असत


नदीच अवखळपणे समुद्राकडे वहाण म्हणेज प्रेम असत

आणि समुद्राचं लाटांच्या भुजा पसरवून तिला आपल्यात सामावून घेणं म्हणजे प्रेम असत.


एका छत्रीत दोघे असणं म्हणजे प्रेम असत

अर्ध तीच भिजणं , अर्ध माझं भिजणं म्हणजे प्रेम असत


कठीण क्षणी साथ देणं म्हणजे प्रेम असत

दूर जाताना मागे वळून बघणं प्रेम असत


आठवणी आठवत गालात हसणं प्रेम असत

तू नसताना तुझा भास होणं प्रेम असत


तुझ्या आठवात गुंतत जाण प्रेम असत

रंगात तुझ्या रंगून जाण प्रेम असत

कारण प्रेम म्हणजे…………… प्रेम म्हणजे………. प्रेम असत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance