चार ओळी
चार ओळी
१) वसुंधरा सोशिक ती
पेलते त्या सावकाश
सारेच पुरुष जातीचे
सूर्य ...बाण...आकाश!
२) आकांत आईबापाचा
काळीज चिरते आहे
संस्कारहीन पिढी ही
आभासात मरते आहे!
३) जीवाला तो द्यावा जीव
मनी ठेवुनी प्रेमभाव
करू कर्तव्य निर्मोही
वसवू प्रेमाचे गाव!
४) शब्दवैभव, शब्दसंपदा वाढो
नांदो यश, किर्ती सदा जीवनी
सदा सुहर्ष वेल गगनी बहरो
लाभो सुख समृद्धी त्रिभुवनी