रंग प्रेमाचा
रंग प्रेमाचा
का भासते
मीच मजला नवी
मनही कवी
जाहले.
आनंद कोणता
ज्यात चिंब नाहते
दर्पनी पाहते
लाजूनि.
मोगरा धुंद
बोले हळूच कानी
तुझिया मनी
प्रेमगंध.
गुपित सारे
कळले मला आज
प्रितीचा साज
निराळा.
बहरले मी
मोहरले अंग अंग
लागताच रंग
प्रेमाचा.