कुटुंब
कुटुंब
कुटुंब
लहान कुटुंबाचे
अनेक फायदे
छोटा कुटुंब ठेवा
सांगतो कायदे
प्रेम मिळेल
ममता मिळेल
सर्वाना द्यायला
वेळ मिळेल
सुखी कुटुंबाची
एकच किल्ली
लहान कुटुंब
हीच गुरुकिल्ली
कमाई आहे थोडी
खर्च खूप वाढली
जर खाणारी तोंडे
कुटुंबात जन्मली
खर्च करता करता
कर्ज किती वाढले
कोणाचेही पहा
समाधान नाही झाले
अंथरुण पाहून
पसरले असते पाय
तर आज ही वेळ
आली असती काय
मुलागचा हवा म्हणून
हट्ट करतात हल्ली
सर्वांच्या सोयी करता
किती खस्ता खाल्ली
मुलाच्या हट्टापायी
झाल्या किती मुली
सुख सोयी मिळेना
कोणालाच मुळी
जर मुलगा मुलगी
मानले एक समान
कुटुंब लहान तरच
सुख आहे महान
हम दो हमारा एक
कुटुंबाचा विचार करा
सुखी कुटुंबासाठी
विसरू नको हा नारा