लावणी
लावणी
नजर माझी लागली वाटेकडे
अहो राया, या ना तुम्ही इकडे
गजरा माळला केसात मी असा
राजसा जवळी येऊन बसा ||धृ||
आठवणीने मला लागली उचकी
विरहाने उरात भरली धसकी
चेहऱ्यावरची चिंता दावितो आरसा
राजसा जवळी येऊन बसा ||1||
किती आठवणीत तुमच्या मी झुरले
आसवांनी डोळे माझे भरले
जीव झाला माझा येडापिसा
राजसा जवळी येऊन बसा ||2||
प्रेमाला आज आली लय भरती
धकधक ठोके काळजाचे वाढती
जीव घुटमळतो जणू पाण्याविना मासा
राजसा जवळी येऊन बसा ||3||
आला होळीचा सण खास
घ्या तुम्ही पुरणपोळीचा घास
उमटू द्या जरा हृदयात ठसा
राजसा जवळी येऊन बसा ||4||