माळेचा दोर
माळेचा दोर
आई घरी नसल्यावर
घर भकास वाटते,
घरात काय चालले
हे कोणालाच ठाऊक नसते.
आई, आई करत
जेव्हा मी फिरते,
आईस ऐकण्यास
मन रडवेले होते.
घेण्यास आमची काळजी
आई तत्पर असते,
कोण घेणार काळजी
जर आईच घरी नसते.
आई आमची दोर
घराला गुंफून ठेवी,
आईच घरी नसल्यावर
माळंच तुटून पडावी.
