STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

साथ

साथ

1 min
222


।। साथ ।।


मिळेल तुमची अशीच साथ

राहतील पाठीशी अनेक हात

संकटाशी सामना करून

संपवू अंधारी काळोखाची रात


एकजुटीने काम केले की

यश हमखास मिळते

एकट्याने जे कधी होत नाही

ते सर्वांच्या सहकार्याने होते


समाजात राहायला शिकलं

एकजुटीने वागायला शिकलं

एकमेकांच्या सुखदुःखात

सहभागी व्हायला शिकलं


एकटा जीव सदाशिव म्हणजे

एकलकोंडा होऊन जातो

मनावर देखील ताबा राहत नाही

मनोरुग्ण झाल्यासारखे वागतो


जीवनात करायची असेल प्रगती

तर सर्वांची घेत चला संगत

सर्वांच्या सोबतीने येत राहील

तुझ्या जीवनात ही रंगत


कुणाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी

आपल्या पाठीवर असावे हात

आशीर्वादाने सौख्य लाभते अन

सुख समृद्धी मिळते आयुष्यात



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational