रंग पांढरा
रंग पांढरा
रंग पांढरा वैराग्याचा
तसाच तो शांतीचा
पराभवाच्या निशाणाचा
पांढरी कबुतरे उडवण्याचा
आकाशाचा फळा निळा
सफेद ढग वर बागडती
सफेद झगा घालुनी
देवदूत खाली उतरती
रंग पांढरा नेव्हीचा
ऐटदार आणि शौर्याचा
रंग पांढरा परिचर्येचा
करुणेचा आणि सेवेचा
पांढरा रंगापासूनच
बनले सप्तरंग
नवरात्रीच्या नऊ रंगात
होऊ सारे दंग
नमुनी आदिमायेला
शरण जाऊया तिजला
ऐश्वर्या आयुष्य आरोग्य
लाभू देत सर्वांना
