आईचं पालुपद....
आईचं पालुपद....
चहा गार होत आहे
असे नेहमी जो-तो म्हणतो,
कारण मी सकाळच्या प्रहरी
शाळेच्या तयारीत व्यस्त असताे..
चहा गार होत आहे
पिऊन टाक लवकर,
चहा पिल्यावर वाटते
अजून पाहिजे होती साखर....
चहा गार होत आहे
आईचं पालुपद नेहमीचं,
चहा थंड होईपर्यंत
शोधाशोध करण्यात गढायचं....
चहा गार होत आहे
तोपर्यंत मारू या या गप्पा,
लवकर चहा पी आता
आई देईल धप्पा.....
