प्रेम
प्रेम
प्रेम ते पहिल्या नजरचे,
लाजणारे, बुजऱ्या मनाचे.
अलगद अलगद डोळ्यांत ,
आणि काळजात शिरणारे.
नकळत सारे साधणारे,
गुपचूप गुपचूप चालणारे.
भासमय सारा आसमंत,
आभासी दुनियेत विहारणारे.
अवचित कधी गिरकी घेते,
आरश्यात कधी हसते, बघते.
रात्रीत साऱ्या जागते अन,,
रातराणी सम गंधते.
बोलते कधी न बोलताही,
अबोलता ,झुरते बिचारे.
प्रेम ते पहिल्या नजरचे
लाजणारे ,बुजऱ्या मनाचे...!

