आयुष्यातील शिक्षक
आयुष्यातील शिक्षक
आपल्या अवतीभवती
अगणित आहेत शिक्षक
शिकवत असतात नित्य
आपणास बरेच दक्षक
मुक्त पक्षी शिकवतात
आयुष्य जगावे स्वछंदी
हिरवीगार वृक्षवल्ली
शिकवी स्थैर्य, दान,आनंदी
प्रत्येक क्षण, अनुभवाचे
शिकवतो जिवनाचा अर्थ
सुख दुखातले वाटेकरी
खरे जीवन सोबती निस्वार्थ
वाट दावते धेय्य, अडथळे
शिकविती अस्थैर्य जीवनात
शिखरे दावी उंची स्वप्नांची
सुर्योदय सुर्यास्त नित जगात
आस, आपुलकी, विश्र्वास
शिकवी माणसाचा खरा चेहरा
ठेच, धोका, अपमान, अपयश
देतो स्व परीक्षणाचा खरा मोहरा
सारेच आहेत शिक्षक येथे
शिकून घेणाऱ्यांना मिळे वाव
विद्यार्थी बनून जगावे जीवनात
मग उलगडतो आयुष्याचा भाव
