STORYMIRROR

Achala Dharap

Fantasy

3  

Achala Dharap

Fantasy

नभांची सहल

नभांची सहल

1 min
178

निळ्या नभांची निघाली सहल अवनीवर 

वा-याच्या गाडीत बसुन निघाले भरभर.


गार वा-याने सोडली गाडी सुसाट

धुक्याने मधेच अडवली त्यांची वाट.


ढगांनी मग केला जोरजोरात गडगडाट 

वीजेनी केला चिडुन कडकडाट.


सु सु करत वा-याने धुक्याचा पडदा कापला

द-या खो-यातुन नीट मार्ग आखला.


नभांना होताच हिरव्या डोंगराचा स्पर्श 

हरपले त्यांचे भान झाला त्यांना हर्ष .


आनंदाश्रू गळले निळ्या नभांतून

अवनी हसली त्या रुपेरी थेंबातून.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy