चंद्र आणि चांदणे
चंद्र आणि चांदणे
चंद्र आणि चांदणे
शिंपीत येते रात्र
तू अन् मी नाममात्र
हा चंद्र आहे साक्षीला
सोबतीला हे चकोराचे चांदणे
तू शांत मंद वारा मी एकांत तुझा
होवू सोबती एकमेकांचे
हातात हात गुंफुनी जन्मभराचे
कोजागिरीचा चंद्र आणि चांदणे
सोबतीला मात्र कायमचे...
