जागर नवरात्रीचा
जागर नवरात्रीचा
जागर नवरात्रीचा
करितो आम्ही सकळ
देवीपुढे नाचू गाऊ
माय माझी ग प्रेमळ १
जागर नवरात्रीचा
उदो आईचा करतो
खेळतो गरबा आम्ही
भजनात मग्न होतो २
देवीचे गीत गाऊन
दांडिया नाच करतो
जागर नवरात्रीचा
दिवस रात्र करतो ३
जागर नवरात्रीचा
स्वतःला मी विसरतो
सप्तशती पाठ करी
अहंभाव हरवतो ४