महान देश
महान देश
भारत देश महान
वीर सावरकरांच्या
स्वप्नातील,
टिळक अन नेताजींच्या
भावमनातील
भारत देश महान. १
भारत देश महान
ऋषीं अन योगियांचा
ज्ञानियाच्या राजाचा
वसुधैव कुटुंबकम
सांगणारा
भारत देश महान. २
भारत देश महान
धार्मिक, सहिष्णुतेचा
विविधतेतही एकतेचा
संदेश विश्वाला
देणारा,
भारत देश महान. ३