अणू रेणू
अणू रेणू
1 min
146
अणू रेणूंचे अजब विश्व
आहे दृष्टीच्या पल्याड
सुक्ष्म जीव अवती भवती
लागे सुक्ष्मदर्शीची जोड १
या सर्वांच्या परे असते
मानवी बुद्धी ती महान
चराचराला व्यापते आहे
तिची गती आहे महान २
अणू रेणूंनी जग व्यापले
सर्व चल अचल भरून गेले
अणू रेणूंची अद्भूत दूनिया
विज्ञानाने सर्व समजून आले ३
विज्ञानाची गती अलौकिक
जग आता विज्ञानात बुडाले
पण जिथे विज्ञान कुंठित होते
तिथे रामकृष्ण धावून आले ४