वादळ
वादळ
जीवनात वादळ येणार
सामना करणे प्राप्त आहे
संकटाला तुला तोंड देणे
यात पुरूषार्थ लपला आहे १
संसार सागर दुस्तर खरा
पार तो करणे प्राप्त आहे
सुख दुःखाचे वादळातून
पैलतीर गाठणार आहे २
वादळात मी खंबीर आहे
मागे आता सरणार नाही
अंतीम ध्येय गाठण्यास
मार्ग क्रमण करत राही ३
सुसाट सुटती वादळ वारे
पण मी डगमगणार नाही
जीवनात यशस्वी होण्यासाठी
कष्टांची साथ सोडणार नाही ४