STORYMIRROR

Ashwini Kothawale

Classics Others

4  

Ashwini Kothawale

Classics Others

अभिमान

अभिमान

1 min
336

निधड्या छातीवर झेलून वार

पडला धारातीर्थी हा देहभार

आठवले क्षणातच जगले आयुष्य जे

डोळ्यासमोर तरळले चेहरे आप्तस्वकीयांचे


शत्रूशी लढला वीर होऊनि जो घडला

देश सेवेच बाळकडू घेऊन स्वाभिमान तो विसरला

अभिमानाने छाती फुलून आली देशाच्या उन्नतीसाठी

गड जिंकले परी वीर दवडले या देश रक्षणासाठी


मातेचे हृदय दाटलं वाट बघता लेकराची

एकांतात अश्रू ढाळून मोकळी होत असे ती माय या देशाची.

स्व कुटुंब सोडून जगला तो वीर देश वाचविण्यासाठी

आभार मानू तयांचे किती .. जो लढला आपल्यासाठी


तोफेचे गोळे, बंदूकीचा मार झेलून राहिला तो वीर देशासाठी

वंदे मातरम चा जयघोष करूया या मातृभूमीसाठी

तिरंग्याची आन-बान-शान राखूया आपल्या भारत मातेसाठी

देशसेवा, देशप्रेम मनात जागवूया उद्याचा भारत घडवण्यासाठी.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics