STORYMIRROR

Ashwini Kothawale

Others

2  

Ashwini Kothawale

Others

श्रावण सरी

श्रावण सरी

1 min
57

श्रावण सरी बरसू लागल्या ..मनात माझ्या झिरपू लागल्या..

मन बेधुंद होऊन गीत गाई.. हळूच वाऱ्याची झुळूक हलवून जाई..


रूप साजिरं श्रावणातल्या सरींच..मन मोहून राही...


टपोऱ्या थेंबानी परसबाग माझी..मोहरुन जाई..


मोगरा, चाफा, जाई, जुई, चमेली च्या फुलांनी सारा परिसर बहरून येई...


मंद सुवास दरवळला चहूकडे..गंध फुलांचा सांगून राही


सडा फुलांचा अंगणात माझ्या..रूप देखणं..मी पाही..


पावसात बहरला, वसंतात फुलला, बगीचा माझा..


रूप देखोन..त्याच न्यारर..मन प्रफुल्लीत होई..


वसंत ऋतूच्या आगमनाने , श्रावण सरींनी केली किमया न्यारी..


नव्यानवलाईची कुसुम पुष्प मी मंदिरात वाही..


छोट्या छोट्या तरू नी आच्छादला बागबगीचा..


लाल, पिवळ्या, पांढऱ्या रंगानी सजून जाई बगीचा माझा..


मी जपला, मी फुलवला मळा फुलांचा हे पाहून मन आनंदून राही.


Rate this content
Log in