पाऊसधारा
पाऊसधारा
1 min
197
मेघ काकुळतीला आला
मोजकेच थेंब बरसवून परसवात गेला
टपोऱ्या थेंबानी जीव व्याकूळ झाला
जीवाची काहील अन् उन्हाचा हाहाकार झाला
गरजता मेघ वाटे भयाण
वीज कडाडता जाई आकाशात ध्यान
बरसतील धारा धाय मोकलून पार
उन्हामुळे धरा तळपली फार
अगणित, असंख्य पाऊस धारा
बिलगल्या धरेस एक होऊनी साऱ्या
शमला दाह अन् विझवली आग
मेघ गरजला पाऊस होऊन आज
सरीवर सरी पाऊस सरी
करता ओली चिंब धरणी जरी
उगवते माळरानावर इवलेसे रोप तरी
पाऊस येता मन शांत, धरा तृप्त होते खरी.
