जन्मदात्री आई
जन्मदात्री आई
तू कुठेही असाे
मी तूला सतत स्मरतो,
तू जरी दिसली नाही
तरी मी तुझ्याशी बोलतो...
तू कुठेही असाे
मी तुला सल्ला विचारते
तूच माझ्या स्वप्नात येऊन
बरं वाईट सांगत असते...
तू कुठेही असाे
माझाच विचार करशील,
जन्मदात्री तू आई
मला कशी विसरशील...
तू कुठेही असाे
सुखात देव ठेवील,
तरीही तुला काळजी
आमची लागून राहील...
