संस्कार (अष्टाक्षरी)
संस्कार (अष्टाक्षरी)
माता जिजाऊ संस्कार
शूर शिवाजी जन्मला
झाला जुलूम उध्वस्त
त्याने स्वराज्य स्थापला
उभा दृष्टांच्या संहारा
सदा तत्पर सेवेस
देह ज्योत स्वयंसिद्ध
चाले तपस्या सालस
मनी दातृत्व भावना
नसे उच्चनीच भेद
मातृ परस्त्री मानले
शुद्ध आचरण वेद
कलयुगी तरूणाई
अंदाधुंदी कारभार
दिशाहीन व्यसनात
अनाचार भ्रष्टाचार
जाण ठेवा स्वातंत्र्याची
थोर आदर्श विवेक
क्रांतिकारी बलिदान
शील समाज रक्षक