उंच माझा झोका
उंच माझा झोका


उंच माझा झोका
माझा झोका
उंच माझा झोका
जवा जातो आभाळात
तवा आनंदाची होते
माझ्या अंगणी बरसात
येता श्रावणाच्या सरी
दाटे माहेरची गोडी
मायबाप बंधू माझा
दिसे बापाची हो माडी
मायबापाच्या सुखाची
झोक्यावर गाते गाणी
बंधूरायाच्या आयुष्याची
देवापुढे करते आळवणी
सई सा-या हो जमल्या
झोका झोका त्या खेळती
गाणी सासर सुखाची
आळीपाळीने म्हणती
लेक सासरी निघते
डोळे येतात भरुन
जणू बापाचे काळीज
कोणी नेते हो ओढून